UPDATES

728x90

468x60

header-ad

9 जानेवरी दिनविशेष।वासुदेव बळवंत फडके। vasudev balwant phadke।dinvishesh। 9 january special day।


वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील शिरढोण या ठिकाणी झाला.वासुदेव फडके यांचे आजोबा शिरढोण जवळ असलेल्या कर्नाळा किल्ल्याचे किल्लेदार होते. त्यामुळे त्यांना लहानपणापासून कुस्ती खेळण्याची आवड निर्माण झाली. घोडेस्वारी ते शिकले. तलवारबाजीचे प्रशिक्षण सुद्धा त्यांनी घेतले. गावी माध्यमिक शिक्षणाची सोय होती. ते शिक्षण पूर्ण करून त्यांनी पुणे गाठले. पुण्यामधील सदाशिव पेठेत राहून इंग्रज सरकारच्या सेवेत दाखल झाले.


सेवेत असताना एकदा त्यांच्या आई खूपच आजारी पडल्या. आईला पाहण्यासाठी त्यांनी इंग्रज सरकारकडे रजा मागितली.पण इंग्रज सरकारने त्यांना रजा दिली नाही. त्यामुळे खूप वेळ गेला. वासुदेव फडके आईला भेटण्या अगोदरच त्यांचं निधन झालं. आपल्याला आईला पाहता आले नाही. याचं दुःख त्यांना खूप झालं. यातूनच त्यांनी इंग्रज सरकारची नोकरी सोडली. आणि त्यांच्या विरुद्ध बोलण्यास सुरुवात केली. जनजागृती सुरू केली. बरेच ठिकाणी भाषणे दिली. सरकार कसे अन्याय करतेय हे ते आपल्या भाषणातून पटवून देऊ लागले.


पुण्यामध्ये असताना त्यांच्यावर महादेव गोविंद रानडे यांचा प्रभाव पडला. आपल्या देशाची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे हे इंग्रजांची ही चूकीची धोरणेच आहेत. तसेच त्यावेळचे क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांचा सुद्धा त्यांच्यावर प्रभाव होता. लहुजी साळवे स्वातंत्र्यासाठी झटत होते. त्यांनी वासुदेवना पटवून दिले की आपल्या या लढ्यामध्ये समाजातील मागासलेल्या जाती आहेत त्यांना सुद्धा आपल्या बरोबरीने सामावून घेतलं पाहिजे. हे महत्वाचं आहे. वासुदेव फडके यांना ते पटले. त्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले.


त्यावेळी एका वर्षी पडलेल्या मोठ्या दुष्काळाकडे इंग्रजांनी दुर्लक्ष केले. ते पाहून वासुदेव फडके यांनी स्वतः दुष्काळी भागात जाऊन त्या ठिकाणच्या लोकांना मदत केली. आणि त्याच वेळी त्यांनी इंग्रजांचे जुलमी सरकार उलथून टाकायचे असे ठरवले. इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढा उभारायचा असा त्यांनी निश्चय केला. त्यासाठी त्यांनी समाजातील सर्व जातींना सामावून घेतले घेतले.त्या तरुणांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देऊन त्यांनी आपल्या सैन्यात भरती केले.


या सैन्याच्या तरुणांच्या साथीने त्यांनी इंग्रजांविरुद्ध युद्धाची घोषणा केली. अनेक ठिकाणी सरकारी खजिन्यावर त्यांनी दरोडा टाकला. त्यावर त्यांनी आपल्या सैन्यातील तरुणांचा चरितार्थ चालवला. इंग्रज सरकारने त्यांना पकडण्यासाठी बक्षिसाची घोषणा केली. खूप प्रयत्न केले. तरीसुद्धा वासुदेव फडके इंग्रजांच्या हाती लागले नाहीत. शेवटी एका बौद्ध विहारामध्ये झोपलेले असताना अटक केली. त्यांना तुरुंगात डांबले. त्यांच्यावर खटला सुरू झाला. त्यांना त्यामध्ये फाशीची शिक्षा होणार होती. पण शेवटी त्यांना आजच्या दिवशी म्हणजेच नऊ जानेवारी त्यांना आजन्म कारावास व तडीपारीची शिक्षा झाली.


अशा या थोर क्रांतिकाराला स्वातंत्र्य लढ्यातील आद्य क्रांतिकारक किंवा सशस्त्र क्रांतीचे जनक मानले जातात.

« PREV
NEXT »

Facebook Comments APPID