UPDATES
latest

728x90

468x60

header-ad
दिनविशेष

random posts

randomposts3

दिनविशेष

दिनविशेष/block-1

Block-2

दिनविशेष/block-7

block-3

दिनविशेष/block-2

Block-4

दिनविशेष/block-2

block-5

दिनविशेष/block-3

Block-6

दिनविशेष/block-8

block-7

दिनविशेष/block-9

block-8

दिनविशेष/block-2

block-9

दिनविशेष/block-2

Latest Articles

10जानेवरी दिनविशेष।ताश्कंद करार।tashkent agreement।dinvishesh। 10 january special day।










 

9 जानेवरी दिनविशेष।वासुदेव बळवंत फडके। vasudev balwant phadke।dinvishesh। 9 january special day।


वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील शिरढोण या ठिकाणी झाला.वासुदेव फडके यांचे आजोबा शिरढोण जवळ असलेल्या कर्नाळा किल्ल्याचे किल्लेदार होते. त्यामुळे त्यांना लहानपणापासून कुस्ती खेळण्याची आवड निर्माण झाली. घोडेस्वारी ते शिकले. तलवारबाजीचे प्रशिक्षण सुद्धा त्यांनी घेतले. गावी माध्यमिक शिक्षणाची सोय होती. ते शिक्षण पूर्ण करून त्यांनी पुणे गाठले. पुण्यामधील सदाशिव पेठेत राहून इंग्रज सरकारच्या सेवेत दाखल झाले.


सेवेत असताना एकदा त्यांच्या आई खूपच आजारी पडल्या. आईला पाहण्यासाठी त्यांनी इंग्रज सरकारकडे रजा मागितली.पण इंग्रज सरकारने त्यांना रजा दिली नाही. त्यामुळे खूप वेळ गेला. वासुदेव फडके आईला भेटण्या अगोदरच त्यांचं निधन झालं. आपल्याला आईला पाहता आले नाही. याचं दुःख त्यांना खूप झालं. यातूनच त्यांनी इंग्रज सरकारची नोकरी सोडली. आणि त्यांच्या विरुद्ध बोलण्यास सुरुवात केली. जनजागृती सुरू केली. बरेच ठिकाणी भाषणे दिली. सरकार कसे अन्याय करतेय हे ते आपल्या भाषणातून पटवून देऊ लागले.


पुण्यामध्ये असताना त्यांच्यावर महादेव गोविंद रानडे यांचा प्रभाव पडला. आपल्या देशाची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे हे इंग्रजांची ही चूकीची धोरणेच आहेत. तसेच त्यावेळचे क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांचा सुद्धा त्यांच्यावर प्रभाव होता. लहुजी साळवे स्वातंत्र्यासाठी झटत होते. त्यांनी वासुदेवना पटवून दिले की आपल्या या लढ्यामध्ये समाजातील मागासलेल्या जाती आहेत त्यांना सुद्धा आपल्या बरोबरीने सामावून घेतलं पाहिजे. हे महत्वाचं आहे. वासुदेव फडके यांना ते पटले. त्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले.


त्यावेळी एका वर्षी पडलेल्या मोठ्या दुष्काळाकडे इंग्रजांनी दुर्लक्ष केले. ते पाहून वासुदेव फडके यांनी स्वतः दुष्काळी भागात जाऊन त्या ठिकाणच्या लोकांना मदत केली. आणि त्याच वेळी त्यांनी इंग्रजांचे जुलमी सरकार उलथून टाकायचे असे ठरवले. इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढा उभारायचा असा त्यांनी निश्चय केला. त्यासाठी त्यांनी समाजातील सर्व जातींना सामावून घेतले घेतले.त्या तरुणांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देऊन त्यांनी आपल्या सैन्यात भरती केले.


या सैन्याच्या तरुणांच्या साथीने त्यांनी इंग्रजांविरुद्ध युद्धाची घोषणा केली. अनेक ठिकाणी सरकारी खजिन्यावर त्यांनी दरोडा टाकला. त्यावर त्यांनी आपल्या सैन्यातील तरुणांचा चरितार्थ चालवला. इंग्रज सरकारने त्यांना पकडण्यासाठी बक्षिसाची घोषणा केली. खूप प्रयत्न केले. तरीसुद्धा वासुदेव फडके इंग्रजांच्या हाती लागले नाहीत. शेवटी एका बौद्ध विहारामध्ये झोपलेले असताना अटक केली. त्यांना तुरुंगात डांबले. त्यांच्यावर खटला सुरू झाला. त्यांना त्यामध्ये फाशीची शिक्षा होणार होती. पण शेवटी त्यांना आजच्या दिवशी म्हणजेच नऊ जानेवारी त्यांना आजन्म कारावास व तडीपारीची शिक्षा झाली.


अशा या थोर क्रांतिकाराला स्वातंत्र्य लढ्यातील आद्य क्रांतिकारक किंवा सशस्त्र क्रांतीचे जनक मानले जातात.

8 जानेवरी दिनविशेष।गॅलेलियो गॅलिली।'Galileo Galilei।dinvishesh।8 january special day।


गॅलिलिओ हा इटली देशातला थोर शास्त्रज्ञ होय. त्याचा जन्म पिसा या ठिकाणी झाला. त्याला सात भावंडे होती. त्यामध्ये तो सगळ्यात मोठा होता. गॅलेलियोचे वडील संगीतकार होते. त्यांच्या वडिलांनी त्याला कोणाचेही दडपण न घेता स्वतंत्रपणे विचार करायला शिकवले. त्यांचे वडील कापड विकण्याचा व लोकर विकण्याचा व्यवसाय करत होते. वडील संगीतकार सतत त्यामध्ये राहिल्यामुळे त्यांच्याच प्रभावामुळे गॅलिलिओने सतारी सारखे असणारे ल्यूट हे वाद्य त्याने शिकून घेतले. त्याच्या साह्याने तो संगीतरचना करू लागला.


गॅलिलिओनी सुद्धा लोकरीचा व्यवसाय केला. कपड्याचा व्यवसाय केला. एखाद्या मठात जाऊन त्या ठिकाणी भिक्षुकी सुद्धा त्यांनी केली. अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टी त्यांने आपल्या जीवनात केल्या. त्यांच्या वडिलांना सतत वाटायचे की आपला गॅलिलिओ हा डॉक्टर व्हावा. आणि म्हणून त्यांनी त्याला पिसा विद्यापीठामध्ये त्याच्या शिकण्याची सोय केली. गॅलिलिओ विद्यापीठ शिकण्यासाठी गेला. पण त्याचे अभ्यासाकडे लक्ष लागत नव्हते. दुसऱ्या ठिकाणी त्याचे लक्ष असायचे.


त्यामुळेच शेवटी गॅलिलिओने विद्यापीठ सोडले. वैद्यकीय मध्ये त्याचा अजिबात रस नव्हता. त्याला गणितामध्ये जास्त रस होता. त्याचा ओढा गणिताकडे जास्त होता. त्यामुळे विद्यापीठातून जाताना पदवी न घेताच त्यांना बाहेर पडावे लागले. काही दिवस त्यांनी मठामध्ये काढले. खाजगी शिकवण्या सुद्धा त्यांनी घेतल्या.


कालांतराने गॅलिलिओला त्याचा एक मित्र त्याच्या मदतीने पिसा विद्यापीठात गणिताच्या प्राध्यापकाची नोकरी लागली. त्या ठिकाणी तो रमू लागला. त्याला लेक्चर देणे आवडायचे. त्या ठिकाणी तो मोकळा होऊ लागला. तेथील मित्रांच्या बरोबर गप्पा गोष्टी करू लागला. तिथूनच त्याने वेगवेगळे संशोधन करण्यास सुरुवात केली. त्या ठिकाणी त्याने बरेच संशोधन केले.


गॅलिलिओने च्या काळात खूप मोठे संशोधन केले. दुर्बिणीचा सर्वात मोठा शोध त्यांनी लावला. त्यामुळे आकाशातील अनेक ग्रहतारे यांचे निरीक्षण करणे शक्य झाले. यामुळे खगोलशास्त्रीय अनेक अद्भुत शोध लागणे शक्य झाले.हायड्रोस्टॅटिक तराजू त्यांनी बनवला.गॅलिलिओने आपला प्रत्येक शोध हा अनेक प्रयोग तयार झालेल्या निकषावर प्रसिद्ध केला. फक्त तोंडी किंवा कागदोपत्री त्यांनी शोध लावला नाही. प्रत्येक शोध त्यांनी प्रयोगाने सिद्ध केला. पृथ्वीचे स्थान विश्वाच्या केंद्रात आहे हा जो समज होता तो समाज त्यांनी आपल्या गणिताच्या अभ्यासातून खोटा ठरवला.


अशा या थोर शास्त्रज्ञांचा मृत्यू 8 जानेवारी 1642 साली झाला.

7 जानेवरी दिनविशेष।सरोजिनी बाबर।Sarojini Babar।dinvishesh।7january special day।


सरोजिनी बाबर यांचा जन्म 7 जानेवारी 1920 या दिवशी झाला. महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील बागणी या गावी त्यांचा जन्म झाला. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण इस्लामपूरमध्ये झाले. 1940 या साली त्या शालांत परीक्षा उत्तीर्ण झाल्या. महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी त्या पुण्याला गेल्या. पुण्यामधील सर परशुरामभाऊ या महाविद्यालयातून त्यांनी शिक्षण घेतले. पुढे त्यांनी मुंबई विद्यापीठातून बी.ए. ही पदवी मिळवली. पुढे जाऊन त्यांनी एम.ए. केले. पीएच.डी.ची पदवी सुद्धा त्यांनी मिळवली.


पारतंत्र्याच्या काळात भारतात स्वातंत्र्याच्या चळवळी चालू होत्या. त्यामध्ये त्यांनी भाग घेतला. त्यांनी त्यावेळी जनजागृती केली. महिला असून देखील या लढ्यामध्ये त्यांनी भाग घेऊन त्यामध्ये मोलाचा वाटा उचलला. महाराष्ट्राची लोकसंस्कृती कशी आहे त्याचप्रमाणे या महाराष्ट्रातील जे साहित्य लिहून ठेवल आहे त्याचं संशोधन संपादन इत्यादी कामे त्यांनी अगदी चांगल्या पद्दधतीने केले.


सरोजिनी बाबर या चांगल्या पद्धतीने आपली मते मांडत असत. त्यामुळे सहाजिकच त्यांच्यावर त्यांच्याकडे बोलण्याची कला चांगली होती. वक्तृत्व कला त्यांच्याकडे होती. त्या गायन सुद्धा करायच्या. त्यांनी त्यामध्ये सुद्धा काही काळ शिक्षण घेतले. गायना मधील थोर व्यक्तींचा त्यांना सहवास लाभला त्यामध्ये गोविंदराव टेंबे,वच्‍सलाबाई महाडिक, ज्योत्स्ना भोळे यांच्याशी त्यांची सतत भेट गाठ होत राहिली त्यामुळे त्यांच्याकडून सुद्धा त्यांना गायनाचे चांगले मार्गदर्शन लाभले.


आकाशवाणी कार्यक्रमांमध्ये सरोजिनी बाबर यांनी भाग घेतला आकाशवाणीवर त्यांनी लोकजीवनावर,लोक संस्कृती लोकगीत अशा विषयांच्या वर त्यांनी मालिका तयार केली. ती प्रसारित देखील केली. सरोजिनी बाबर यांनी रानजाई ही मालिका सुद्धा मुंबई दूरदर्शनवरून सादर केली.


सरोजिनी बाबर या महाराष्ट्र विधानसभा आणि विधान परिषद या सभागृहाच्या सदस्या होत्या. त्याचप्रमाणे भारतीय राज्यसभा या सभागृहाच्या सुद्धा त्या सदस्या होत्या. समाज शिक्षण माला हे मासिक सुद्धा त्यांनी बरेच दिवस बरेच वर्षे त्यांनी चालवले. महाराष्ट्र राज्य लोक साहित्य समितीच्या अध्यक्षा होत्या. सरोजिनी बाबर यांनी अनेक कादंबऱ्या, कथासंग्रह,ललित लेख,काव्यसंग्रह लिहिले.


मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी लोकसाहित्य संमेलन घडवून आणले. त्यामध्ये त्यांनी अनेक परिसंवाद यांचे नियोजन केले. लोककलांचे समाजातील लोकांनी ज्या कलांमध्ये कौशल्य प्राप्त केले. अशा कलांचे प्रदर्शन त्यांनी संमेलनामध्ये भरवले.


पुणे विद्यापीठ त्यांना डी.लिट. ही देऊन गौरवले. मराठा सेवा संघाचा विश्वभुषण पुरस्कार त्यांना दिला गेला. पुणे महानगरपालिकेचा पठ्ठे बापूराव हा पुरस्कार त्यांना मिळाला. राहुरी कृषी विद्यापीठाने त्यांना डॉक्टरेट ऑफ सायन्स याने त्यांचा गौरव केला.

6 जानेवरी दिनविशेष । विजय तेंडुलकर । Vijay Tendulkar। ‌dinvishesh । 6 january special day।

विजय तेंडुलकर यांचा जन्म कोल्हापूर मध्ये झाला.6 जानेवारी 1928 रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव होते धोंडोपंत तेंडुलकर ते स्वतः लेखक होते त्याचप्रमाणे हौशी नट होते आणि प्रकाशक देखील होते. कौटुंबिक पार्श्वभूमी अशी लागल्यामुळे सहाजिकच विजय तेंडुलकरांचा कल हा साहित्याकडे लागला. त्याचप्रमाणे अनेक थोर साहित्यिकांचे वाचन त्यामुळेसुद्धा त्यांची घडवणूक झाली.


या काळात भारत पारतंत्र्यात होता भारताचा स्वातंत्र्यलढा चालू होता. त्यामध्ये तेंडुलकरांनी सहभाग घेतला. तेसुद्धा या चळवळीत सहभागी झाले.तेंडुलकरांचे मॅट्रिक पर्यंत शिक्षण झाले. स्वातंत्र्य चळवळीत असताना या कालखंडातील विविध विचारांच्या लोकांची जवळून ओळख झाली. तेंडुलकर हे मुंबई आणि पुणे या ठिकाणीच त्यांनी जास्तीत जास्त काळ घालविला.


ग्रहस्थ हे विजय तेंडुलकरांचे पहिले नाटक होय. पुढे जाऊन याच नाटकाचे त्यांनी पुन्हा लेखन केले आणि त्या नाटकाला त्यांनी कावळ्यांची शाळा हे नाव दिले. रंगभूमीवर येणारे त्यांचे पहिले नाटक म्हणजे श्रीमंत होय. त्यांनी आपल्या नाटकातून माणसाच्या जीवनाचा त्याच बरोबर त्याच्या अनेक विचारांचा त्यांनी विचार मांडले आहे. त्यांनी आपल्या नाटकावर किंवा लेखनावर अशा एका विशिष्ट विचारसरणीचा ठसा उमटवू दिला नाही. तर स्वतः त्यांनी मनापासून लेखन केले.


शांतता कोर्ट चालू आहे यासारख्या नाटकांमधून त्यांनी समाजाला प्रसंगी जणू काही आपण बंड करतोय. अशा स्वरूपाचे लेखन सुद्धा त्यांनी केले. त्याचप्रमाणे सखाराम बाईंडर हा एक वेगळा तेवढाच स्फोटक त्यांनी हाताळला घाशीराम कोतवाल हा सुद्धा विषय त्यांनी परंपरागत तंत्राला धक्का देऊन डॉग त्यांनी प्रयोगशील भाग सुद्धा केल्या.


तेंडूलकरांच्या लेखनाबरोबरच त्यांनी ज्या मुलाखती दिल्या त्या अतिशय सडेतोडपणे दिल्या. आपल्याला काय वाटते ते त्यांनी समाजासमोर ठेवले. त्यामुळे बऱ्याच वेळा वाद-विवाद सुद्धा झाले. सामना,सिंहासन,आक्रीत,अर्धसत्य,आघात अशा प्रसिद्ध सामाजिक भान ठेवणाऱ्या चित्रपटांच्या पटकथा त्यांनी लिहिल्या. मानवी मनाचे जीवनामध्ये बिघडणारी संबंध त्यातील ताण त्याचप्रमाणे व्यवस्थांचा बंदिस्तपण त्यांनी आपल्या लेखनातून टिपले.


देशातील वाढता हिंसाचार या विषयावर अभ्यास करण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली होती त्याचप्रमाणे त्यांनी 1979 ते 81 त्यांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस या प्रसिद्ध संस्थेत अभ्यागत प्राध्यापक म्हणून काम केले. नाटकाविषयी ज्यांना आस्था,आपुलकी आहे. अशा संस्था आणि त्यामध्ये काम करणारे जे लोक आहेत त्यांच्याबद्दल तेंडुलकरांच्या मनात जिव्हाळा होता.


कुसुमाग्रज प्रतिष्ठान तर्फे देण्यात येणाऱ्या जनस्थान पुरस्काराचे विजय तेंडुलकर हे पहिले मानकरी होते. त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला. पद्मभूषण,महाराष्ट्र गौरव हे सुद्धा पुरस्कार त्यांना मिळाले. मध्य प्रदेश सरकारचा कालिदास सन्मान त्यांना मिळाला आहे.

4 जानेवरी दिनविशेष । आयझॅक न्यूटन । ijak nutan । ‌dinvishesh । indira sant। 4 january special day।


सर आयझॅक न्यूटन यांचा जन्म 4 जानेवारी 1643 मध्ये इंग्लंडमधील लिंकनशायर काउंटीच्या वूलस्थॉर्प या गावात झाला.आयझॅक न्यूटन यांचे सर्व बालपण त्यांच्या आजीजवळ गेले. वयाच्या बारा वर्षापर्यंत न्यूटन हे दोन वर्षे शाळेत गेले. त्यांना गणिताची आवड निर्माण झाली होती. आयझॅक च्या आईने न्यूटनला शाळेतून काढून टाकले. आणि आपल्या शेतामध्ये कामाला लावले.

एक दिवस काय झाले न्यूटन झाडाच्या सावलीत बसला होता. शेतामध्ये वारा वाहत होता. तल्लख बुद्धीचा न्यूटन हा त्याच्या स्वभावामुळे स्वस्थ बसत नव्हता. त्याच्या मनात काय आले काय माहित त्याने ठरवले आता हा जो शेतामध्ये वारा वाहतोय तो मोजायचा. पण वारा फोडण्यासाठी त्याच्याजवळ साधनच नव्हते.आयझॅक पहिल्यांदा त्याने वाऱ्याच्या दिशेने उडी मारली. ज्या ठिकाणी उडी पडली तेथे त्याने एक दगड ठेवला. त्याने वेळाने वाऱ्याच्या उलट दिशेने उडी मारली व त्या उडीच्या जागी दगड ठेवला.

या दोन दगडांमधील अंतर एका दोरीच्या साह्याने आयझॅक न्यूटन ने मोजले. ते मोजत असताना त्यांच्याजवळ त्याचे मामा आले. मामा ने विचारले न्यूटनला तू काय करतोस नेत्याने सांगितले मी वाऱ्याचा वेग मोजतो आहे. तेव्हा न्यूटनच्या मामाच्या लक्षात आले कि न्यूटन हा अतिशय तल्लख बुध्दीचा मुलगा आहे. न्यूटनला पुढे लगेच शाळेत दाखल केले.

पुढे न्यूटन ट्रिनिटी कॉलेजमध्ये शिक्षण शिक्षणासाठी गेले. सन 1668 साली न्यूटन यांनी दुर्बिणीचा शोध लावला. ही दुर्बीण आजही इंग्लंडमधील लंडन म्युझियम मध्ये आपल्याला पाहायला मिळते. गुरुत्वाकर्षणाचा सर्वात महत्वाचा शोध न्यूटन यांनी लावला. गुरुत्वाकर्षणा मध्ये गुरुत्वीय बल हे नेहमी व जाणाऱ्या वस्तूच्या विरुद्ध दिशेने असते. आणि म्हणून वर फेकलेल्या वस्तूची गती कमी कमी होत जाते व शेवटी ती शून्य होते. आणि म्हणून पोस्ट वर न जाता खाली पडते. खाली पडताना तिच्या गतीत गुरुत्वीय बला मुळेच सतत वाढ होत असते.या शोधाने न्यूटन यांनी जगाला एका वेगळ्याच वळणावर नेले.


गतीविषयक नियम पहिला नियम,दुसरा नियम आणि तिसरा नियम यांचासुद्धा शोध न्यूटन ने लावला. अशा या थोर संशोधकाचा मृत्यू 20 मार्च 1927 रोजी झाला.


                                                                                              इंदिरा संत

इंदिरा संत यांचे पूर्वीचे नाव इंदिरा दिक्षीत होते. त्यांचा जन्म 4 जानेवारी 1914 रोजी झाला. कर्नाटकातील इंडिया गावी झाला. त्यांचे सर्व शिक्षण कोल्हापूर व पुणे येथे झाले. बेळगाव मध्ये कॉलेज कॉलेज मध्ये अध्यापिका म्हणून सुरुवात केली. पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजातील नारायण संत यांच्याशी त्यांचा विवाह झाला. आई पत्नी मुलगी यांच्या नात्यातून भारतीय स्त्रीचे खडतर जीवन त्यांनी आपल्या कवितांमधून हळुवारपणे मांडले.

3 जानेवारी दिनविशेष। सावित्रीबाई फुले । January 3 special day । savitribai phule । ‌dinvishesh ।




सावित्रीबाई ज्योतिराव फुले Savitribai Phule त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील नायगाव या ठिकाणी झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर खंडोजी नेवसे पाटील होते. सावित्रीबाई फुले यांचे वडील गावचे पाटील होते. सावित्रीबाई फुले यांचा विवाह ज्योतिराव फुले Jyotirao Phule यांच्याशी झाला. सावित्रीबाईंचे वय होते नऊ वर्ष तर ज्योतिरावांचे वय होते तेरा वर्षे होते. सावित्रीबाईंच्या सासर्‍यांचा व्यवसाय फुलांचा होता त्यामुळे त्यांना फुले हे आडनाव मिळाले. ज्योतिराव फुलेंनी स्वतः शिकले व सावित्रीबाई नाही शिकवले.


त्यावेळी असणाऱ्या पारंपारिक पद्धतींचा त्रास सावित्रीबाईंना खूप झाला. यामधूनही मार्ग काढत त्यांनी 1 जानेवारी इसवी सन 848 रोजी पुण्यातील बुधवार पेठेतील भिडे वाड्यात सावित्रीबाईंनी मुलींची शाळा काढली. अरेच्या कर्मठ समाजाच्या विरोधाला न जुमानता विवाहानंतर सुद्धा शिक्षण घेतले. आणि त्यानंतर स्वतः शिक्षण द्यायला सुरुवात केली. चार वर्षाच्या कालावधीत त्यांनी 18 शाळा उघडल्या आणि त्या चांगल्या पद्धतीने चालवल्या .


मुंबईतल्या गिरगावात ही कमलाबाई हायस्कूल नावाची मुलींसाठी शाळा सुरू केली. सावित्रीबाईंच्या शाळेत सुरवातीला पाच सहा मुली होत्या पुढे पुढे ही संख्या जाऊन 45 पर्यंत जाऊन पोचली. हे त्यावेळच्या कर्मठ लोकांना जेवण झाले नाही त्यामुळे धर्म बुडाला बुडणार असे ते सांगू लागले सनातन्यांनी खूप मोठा विरोध केला अंगावर शेण फेकले. पण खूप मोठा संघर्ष करत सावित्रीबाईंचा शिक्षणप्रसाराचा उपक्रम चालूच राहिला. त्यासाठी त्यांना घर सोडावे लागले.अनेक आघात होऊनही सावित्रीबाई डगमगल्या नाहीत.


सावित्रीबाईंचे शिक्षणाच्या प्रसाराचे काम चालू होते. त्याचबरोबर आपल्याला सामाजिक क्षेत्रात सुद्धा काम करावयाचे आहे ते गरजेचे आहे. हे त्यांच्या लक्षात आले. स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे हे त्यांच्या लक्षात आले. समाजामध्ये असणाऱ्या क्रूर रुढींनाही त्यांनी आळा घातला. बालविवाह प्रथेला त्यांनी विरोध केला. बालक विवाहामुळे लहानपणीच मुली विधवा व्हायच्या. समाजात विधवांना पुनर्विवाह करता येत नव्हता.. पतीच्या निधनानंतर अशा विधवांना सती जावे लागे किंवा त्यांना आपले डोक्याचे सर्व केस काढायचे लागायचे. त्यामुळे अशा गोष्टींना सावित्रीबाईनी विरोध केला. समाजामध्ये जागृती निर्माण केली. समाजामध्ये याविरुद्ध आवाज उठवला.


सावित्रीबाई फुले यांनी हे काम करता करता त्यांनी लेखन सुद्धा केले. त्यामध्ये काव्यफुले हा काव्यसंग्रह, सावित्रीबाईंची गाणी, बावनकशी आणि ज्योतिबाची भाषणे याचे संपादन केले. सावित्रीबाई फुले यांनी केलेले काम पाहून ब्रिटिशांनी सुद्धा त्यांचं कौतुक केलं. सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या शिक्षिका ठरल्या.अशा या थोर सावित्रीबाई फुले यांचे शिक्षणातील कार्य खूप मोठे होते. सामाजिक क्षेत्रातील काम सुद्धा खूप मोठे राहिले. त्यांच्या या कामा बद्दल कृतज्ञता म्हणून सन 1995 पासून 3 जानेवारी हा सावित्रीबाईंचा जन्मदिवस बालिका दिन म्हणून साजरा केला जातो.

2 जानेवारी दिनविशेष । भारतरत्न । January 2 special day । Bharat ratna award। dinvishesh ।


डॉ. राजेंद्रप्रसाद Rajendra Prasad यांनी 2 जानेवारी 1954 या दिवशी भारतरत्न Bharat ratna award पुरस्कारास मान्यता दिली. भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. देशामध्ये जे लोक चांगले काम करतात. भारत देशाचे नाव जगभरात नावारूपास आणतात. त्यांना हा पुरस्कार दिला जातो. ज्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो त्यांनी आपल सर्व आयुष्य या चांगल्या कामासाठी खर्च केलेला असतं. अनेक लोकांना हा मरणोत्तर पुरस्कार त्या व्यक्ती मयत झाल्यानंतर दिला गेला आहे.


पुरस्कार देत असताना साहित्य,कला,विज्ञान,जगाच्या शांतीसाठी साठी प्रयत्न करणारे, सेवा त्याचप्रमाणे उद्योगांमध्ये ज्याने खूप मोठं काम केलेला आहे अशा लोकांना हा सन्मान दिला जातो. सनदी सेवा बजावणाऱ्या व्यक्तींना सुद्धा व अतुलनीय कामगिरी बजावणाऱ्यांना हा पुरस्कार देऊन गौरवले जाते.


सन 1995 साली असे लक्षात आले की ज्या व्यक्ती मयत झालेले आहेत. त्या व्यक्तीने सुद्धा खूप मोठं काम करून ठेवलेलं आहे. अशा व्यक्तींना हा पुरस्कार देण्यासाठी 1955 साली कायद्यामध्ये काही बदल करून अशा व्यक्तींना मरणोत्तर भारतरत्न देण्याची घोषणा करण्यात आली. आत्तापर्यंत दहापेक्षा जास्त लोकांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार दिला गेला आहे.


क्रीडा क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना 2014 साली पुरस्कारांमध्ये स्थान देण्यात आले. या पुरस्काराचे जी वैशिष्ट्ये आहेत. त्याचे जे काही नियम आहेत हे सर्व भारत सरकारच्या राजपत्रात आहेत. 2 फेब्रुवारी 1954 साली पहिला भारतरत्न पुरस्कार त्यावेळचे राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते दिला गेला. पहिला पुरस्कार भारताचे माजी राष्ट्रपती व थोर शिक्षणतज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन sarvepalli radhakrishnan यांना दिला गेला.


या पुरस्काराचे वैशिष्ट्य म्हणजे हे एका पदकाच्या च्या स्वरूपात पदकाच्या एका बाजूला उगवलेला सूर्य आहे.आणि त्या सूर्यबिंबावर भारतरत्न देवगिरी लिपीत कोरलेलं आहे. पदकाच्या दुसऱ्या बाजूला मधोमध भारताचे राजचिन्ह कोरलेले आहे व त्याच्या खाली सत्यमेव जयते कोरले आहे. हा पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्तेच दिला जातो.


आतापर्यंत डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, चक्रवर्ती राजगोपालचारी, डॉ. चंद्रशेखर वेंकट रमण, डॉ. भगवान दास,डॉ. विश्वेश्वरय्या,जवाहरलाल नेहरू,गोविंद वल्लभ पंत,धोंडो केशव कर्वे, डॉ. बिधान चंद्र रॉय,पुरुषोत्तम दास टंडन, डॉ. राजेंद्र प्रसाद,झाकीर हुसेन,लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, मदर तेरेसा, डॉ. बाबासाहेब आंबेडकरअशा अनेक प्रसिद्ध थोर व्यक्तीना पुरस्कार दिला गेला आहे.त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य लोकांसाठी वेचले आपल्या कामासाठी वेचले . अशा आणखीन काही थोर व्यक्तींंना सुध्दा हा पुरस्कार दिला गेला आहे.