UPDATES

728x90

468x60

header-ad

8 जानेवरी दिनविशेष।गॅलेलियो गॅलिली।'Galileo Galilei।dinvishesh।8 january special day।


गॅलिलिओ हा इटली देशातला थोर शास्त्रज्ञ होय. त्याचा जन्म पिसा या ठिकाणी झाला. त्याला सात भावंडे होती. त्यामध्ये तो सगळ्यात मोठा होता. गॅलेलियोचे वडील संगीतकार होते. त्यांच्या वडिलांनी त्याला कोणाचेही दडपण न घेता स्वतंत्रपणे विचार करायला शिकवले. त्यांचे वडील कापड विकण्याचा व लोकर विकण्याचा व्यवसाय करत होते. वडील संगीतकार सतत त्यामध्ये राहिल्यामुळे त्यांच्याच प्रभावामुळे गॅलिलिओने सतारी सारखे असणारे ल्यूट हे वाद्य त्याने शिकून घेतले. त्याच्या साह्याने तो संगीतरचना करू लागला.


गॅलिलिओनी सुद्धा लोकरीचा व्यवसाय केला. कपड्याचा व्यवसाय केला. एखाद्या मठात जाऊन त्या ठिकाणी भिक्षुकी सुद्धा त्यांनी केली. अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टी त्यांने आपल्या जीवनात केल्या. त्यांच्या वडिलांना सतत वाटायचे की आपला गॅलिलिओ हा डॉक्टर व्हावा. आणि म्हणून त्यांनी त्याला पिसा विद्यापीठामध्ये त्याच्या शिकण्याची सोय केली. गॅलिलिओ विद्यापीठ शिकण्यासाठी गेला. पण त्याचे अभ्यासाकडे लक्ष लागत नव्हते. दुसऱ्या ठिकाणी त्याचे लक्ष असायचे.


त्यामुळेच शेवटी गॅलिलिओने विद्यापीठ सोडले. वैद्यकीय मध्ये त्याचा अजिबात रस नव्हता. त्याला गणितामध्ये जास्त रस होता. त्याचा ओढा गणिताकडे जास्त होता. त्यामुळे विद्यापीठातून जाताना पदवी न घेताच त्यांना बाहेर पडावे लागले. काही दिवस त्यांनी मठामध्ये काढले. खाजगी शिकवण्या सुद्धा त्यांनी घेतल्या.


कालांतराने गॅलिलिओला त्याचा एक मित्र त्याच्या मदतीने पिसा विद्यापीठात गणिताच्या प्राध्यापकाची नोकरी लागली. त्या ठिकाणी तो रमू लागला. त्याला लेक्चर देणे आवडायचे. त्या ठिकाणी तो मोकळा होऊ लागला. तेथील मित्रांच्या बरोबर गप्पा गोष्टी करू लागला. तिथूनच त्याने वेगवेगळे संशोधन करण्यास सुरुवात केली. त्या ठिकाणी त्याने बरेच संशोधन केले.


गॅलिलिओने च्या काळात खूप मोठे संशोधन केले. दुर्बिणीचा सर्वात मोठा शोध त्यांनी लावला. त्यामुळे आकाशातील अनेक ग्रहतारे यांचे निरीक्षण करणे शक्य झाले. यामुळे खगोलशास्त्रीय अनेक अद्भुत शोध लागणे शक्य झाले.हायड्रोस्टॅटिक तराजू त्यांनी बनवला.गॅलिलिओने आपला प्रत्येक शोध हा अनेक प्रयोग तयार झालेल्या निकषावर प्रसिद्ध केला. फक्त तोंडी किंवा कागदोपत्री त्यांनी शोध लावला नाही. प्रत्येक शोध त्यांनी प्रयोगाने सिद्ध केला. पृथ्वीचे स्थान विश्वाच्या केंद्रात आहे हा जो समज होता तो समाज त्यांनी आपल्या गणिताच्या अभ्यासातून खोटा ठरवला.


अशा या थोर शास्त्रज्ञांचा मृत्यू 8 जानेवारी 1642 साली झाला.

« PREV
NEXT »

Facebook Comments APPID