विजय तेंडुलकर यांचा जन्म कोल्हापूर मध्ये झाला.6 जानेवारी 1928 रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव होते धोंडोपंत तेंडुलकर ते स्वतः लेखक होते त्याचप्रमाणे हौशी नट होते आणि प्रकाशक देखील होते. कौटुंबिक पार्श्वभूमी अशी लागल्यामुळे सहाजिकच विजय तेंडुलकरांचा कल हा साहित्याकडे लागला. त्याचप्रमाणे अनेक थोर साहित्यिकांचे वाचन त्यामुळेसुद्धा त्यांची घडवणूक झाली.
या काळात भारत पारतंत्र्यात होता भारताचा स्वातंत्र्यलढा चालू होता. त्यामध्ये तेंडुलकरांनी सहभाग घेतला. तेसुद्धा या चळवळीत सहभागी झाले.तेंडुलकरांचे मॅट्रिक पर्यंत शिक्षण झाले. स्वातंत्र्य चळवळीत असताना या कालखंडातील विविध विचारांच्या लोकांची जवळून ओळख झाली. तेंडुलकर हे मुंबई आणि पुणे या ठिकाणीच त्यांनी जास्तीत जास्त काळ घालविला.
ग्रहस्थ हे विजय तेंडुलकरांचे पहिले नाटक होय. पुढे जाऊन याच नाटकाचे त्यांनी पुन्हा लेखन केले आणि त्या नाटकाला त्यांनी कावळ्यांची शाळा हे नाव दिले. रंगभूमीवर येणारे त्यांचे पहिले नाटक म्हणजे श्रीमंत होय. त्यांनी आपल्या नाटकातून माणसाच्या जीवनाचा त्याच बरोबर त्याच्या अनेक विचारांचा त्यांनी विचार मांडले आहे. त्यांनी आपल्या नाटकावर किंवा लेखनावर अशा एका विशिष्ट विचारसरणीचा ठसा उमटवू दिला नाही. तर स्वतः त्यांनी मनापासून लेखन केले.
शांतता कोर्ट चालू आहे यासारख्या नाटकांमधून त्यांनी समाजाला प्रसंगी जणू काही आपण बंड करतोय. अशा स्वरूपाचे लेखन सुद्धा त्यांनी केले. त्याचप्रमाणे सखाराम बाईंडर हा एक वेगळा तेवढाच स्फोटक त्यांनी हाताळला घाशीराम कोतवाल हा सुद्धा विषय त्यांनी परंपरागत तंत्राला धक्का देऊन डॉग त्यांनी प्रयोगशील भाग सुद्धा केल्या.
तेंडूलकरांच्या लेखनाबरोबरच त्यांनी ज्या मुलाखती दिल्या त्या अतिशय सडेतोडपणे दिल्या. आपल्याला काय वाटते ते त्यांनी समाजासमोर ठेवले. त्यामुळे बऱ्याच वेळा वाद-विवाद सुद्धा झाले. सामना,सिंहासन,आक्रीत,अर्धसत्य,आघात अशा प्रसिद्ध सामाजिक भान ठेवणाऱ्या चित्रपटांच्या पटकथा त्यांनी लिहिल्या. मानवी मनाचे जीवनामध्ये बिघडणारी संबंध त्यातील ताण त्याचप्रमाणे व्यवस्थांचा बंदिस्तपण त्यांनी आपल्या लेखनातून टिपले.
देशातील वाढता हिंसाचार या विषयावर अभ्यास करण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली होती त्याचप्रमाणे त्यांनी 1979 ते 81 त्यांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस या प्रसिद्ध संस्थेत अभ्यागत प्राध्यापक म्हणून काम केले. नाटकाविषयी ज्यांना आस्था,आपुलकी आहे. अशा संस्था आणि त्यामध्ये काम करणारे जे लोक आहेत त्यांच्याबद्दल तेंडुलकरांच्या मनात जिव्हाळा होता.
कुसुमाग्रज प्रतिष्ठान तर्फे देण्यात येणाऱ्या जनस्थान पुरस्काराचे विजय तेंडुलकर हे पहिले मानकरी होते. त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला. पद्मभूषण,महाराष्ट्र गौरव हे सुद्धा पुरस्कार त्यांना मिळाले. मध्य प्रदेश सरकारचा कालिदास सन्मान त्यांना मिळाला आहे.