सावित्रीबाई ज्योतिराव फुले Savitribai Phule त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील नायगाव या ठिकाणी झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर खंडोजी नेवसे पाटील होते. सावित्रीबाई फुले यांचे वडील गावचे पाटील होते. सावित्रीबाई फुले यांचा विवाह ज्योतिराव फुले Jyotirao Phule यांच्याशी झाला. सावित्रीबाईंचे वय होते नऊ वर्ष तर ज्योतिरावांचे वय होते तेरा वर्षे होते. सावित्रीबाईंच्या सासर्यांचा व्यवसाय फुलांचा होता त्यामुळे त्यांना फुले हे आडनाव मिळाले. ज्योतिराव फुलेंनी स्वतः शिकले व सावित्रीबाई नाही शिकवले.
त्यावेळी असणाऱ्या पारंपारिक पद्धतींचा त्रास सावित्रीबाईंना खूप झाला. यामधूनही मार्ग काढत त्यांनी 1 जानेवारी इसवी सन 848 रोजी पुण्यातील बुधवार पेठेतील भिडे वाड्यात सावित्रीबाईंनी मुलींची शाळा काढली. अरेच्या कर्मठ समाजाच्या विरोधाला न जुमानता विवाहानंतर सुद्धा शिक्षण घेतले. आणि त्यानंतर स्वतः शिक्षण द्यायला सुरुवात केली. चार वर्षाच्या कालावधीत त्यांनी 18 शाळा उघडल्या आणि त्या चांगल्या पद्धतीने चालवल्या .
मुंबईतल्या गिरगावात ही कमलाबाई हायस्कूल नावाची मुलींसाठी शाळा सुरू केली. सावित्रीबाईंच्या शाळेत सुरवातीला पाच सहा मुली होत्या पुढे पुढे ही संख्या जाऊन 45 पर्यंत जाऊन पोचली. हे त्यावेळच्या कर्मठ लोकांना जेवण झाले नाही त्यामुळे धर्म बुडाला बुडणार असे ते सांगू लागले सनातन्यांनी खूप मोठा विरोध केला अंगावर शेण फेकले. पण खूप मोठा संघर्ष करत सावित्रीबाईंचा शिक्षणप्रसाराचा उपक्रम चालूच राहिला. त्यासाठी त्यांना घर सोडावे लागले.अनेक आघात होऊनही सावित्रीबाई डगमगल्या नाहीत.
सावित्रीबाईंचे शिक्षणाच्या प्रसाराचे काम चालू होते. त्याचबरोबर आपल्याला सामाजिक क्षेत्रात सुद्धा काम करावयाचे आहे ते गरजेचे आहे. हे त्यांच्या लक्षात आले. स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे हे त्यांच्या लक्षात आले. समाजामध्ये असणाऱ्या क्रूर रुढींनाही त्यांनी आळा घातला. बालविवाह प्रथेला त्यांनी विरोध केला. बालक विवाहामुळे लहानपणीच मुली विधवा व्हायच्या. समाजात विधवांना पुनर्विवाह करता येत नव्हता.. पतीच्या निधनानंतर अशा विधवांना सती जावे लागे किंवा त्यांना आपले डोक्याचे सर्व केस काढायचे लागायचे. त्यामुळे अशा गोष्टींना सावित्रीबाईनी विरोध केला. समाजामध्ये जागृती निर्माण केली. समाजामध्ये याविरुद्ध आवाज उठवला.
सावित्रीबाई फुले यांनी हे काम करता करता त्यांनी लेखन सुद्धा केले. त्यामध्ये काव्यफुले हा काव्यसंग्रह, सावित्रीबाईंची गाणी, बावनकशी आणि ज्योतिबाची भाषणे याचे संपादन केले. सावित्रीबाई फुले यांनी केलेले काम पाहून ब्रिटिशांनी सुद्धा त्यांचं कौतुक केलं. सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या शिक्षिका ठरल्या.अशा या थोर सावित्रीबाई फुले यांचे शिक्षणातील कार्य खूप मोठे होते. सामाजिक क्षेत्रातील काम सुद्धा खूप मोठे राहिले. त्यांच्या या कामा बद्दल कृतज्ञता म्हणून सन 1995 पासून 3 जानेवारी हा सावित्रीबाईंचा जन्मदिवस बालिका दिन म्हणून साजरा केला जातो.