UPDATES
latest

728x90

468x60

header-ad

2 जानेवारी दिनविशेष । भारतरत्न । January 2 special day । Bharat ratna award। dinvishesh ।


डॉ. राजेंद्रप्रसाद Rajendra Prasad यांनी 2 जानेवारी 1954 या दिवशी भारतरत्न Bharat ratna award पुरस्कारास मान्यता दिली. भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. देशामध्ये जे लोक चांगले काम करतात. भारत देशाचे नाव जगभरात नावारूपास आणतात. त्यांना हा पुरस्कार दिला जातो. ज्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो त्यांनी आपल सर्व आयुष्य या चांगल्या कामासाठी खर्च केलेला असतं. अनेक लोकांना हा मरणोत्तर पुरस्कार त्या व्यक्ती मयत झाल्यानंतर दिला गेला आहे.


पुरस्कार देत असताना साहित्य,कला,विज्ञान,जगाच्या शांतीसाठी साठी प्रयत्न करणारे, सेवा त्याचप्रमाणे उद्योगांमध्ये ज्याने खूप मोठं काम केलेला आहे अशा लोकांना हा सन्मान दिला जातो. सनदी सेवा बजावणाऱ्या व्यक्तींना सुद्धा व अतुलनीय कामगिरी बजावणाऱ्यांना हा पुरस्कार देऊन गौरवले जाते.


सन 1995 साली असे लक्षात आले की ज्या व्यक्ती मयत झालेले आहेत. त्या व्यक्तीने सुद्धा खूप मोठं काम करून ठेवलेलं आहे. अशा व्यक्तींना हा पुरस्कार देण्यासाठी 1955 साली कायद्यामध्ये काही बदल करून अशा व्यक्तींना मरणोत्तर भारतरत्न देण्याची घोषणा करण्यात आली. आत्तापर्यंत दहापेक्षा जास्त लोकांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार दिला गेला आहे.


क्रीडा क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना 2014 साली पुरस्कारांमध्ये स्थान देण्यात आले. या पुरस्काराचे जी वैशिष्ट्ये आहेत. त्याचे जे काही नियम आहेत हे सर्व भारत सरकारच्या राजपत्रात आहेत. 2 फेब्रुवारी 1954 साली पहिला भारतरत्न पुरस्कार त्यावेळचे राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते दिला गेला. पहिला पुरस्कार भारताचे माजी राष्ट्रपती व थोर शिक्षणतज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन sarvepalli radhakrishnan यांना दिला गेला.


या पुरस्काराचे वैशिष्ट्य म्हणजे हे एका पदकाच्या च्या स्वरूपात पदकाच्या एका बाजूला उगवलेला सूर्य आहे.आणि त्या सूर्यबिंबावर भारतरत्न देवगिरी लिपीत कोरलेलं आहे. पदकाच्या दुसऱ्या बाजूला मधोमध भारताचे राजचिन्ह कोरलेले आहे व त्याच्या खाली सत्यमेव जयते कोरले आहे. हा पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्तेच दिला जातो.


आतापर्यंत डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, चक्रवर्ती राजगोपालचारी, डॉ. चंद्रशेखर वेंकट रमण, डॉ. भगवान दास,डॉ. विश्वेश्वरय्या,जवाहरलाल नेहरू,गोविंद वल्लभ पंत,धोंडो केशव कर्वे, डॉ. बिधान चंद्र रॉय,पुरुषोत्तम दास टंडन, डॉ. राजेंद्र प्रसाद,झाकीर हुसेन,लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, मदर तेरेसा, डॉ. बाबासाहेब आंबेडकरअशा अनेक प्रसिद्ध थोर व्यक्तीना पुरस्कार दिला गेला आहे.त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य लोकांसाठी वेचले आपल्या कामासाठी वेचले . अशा आणखीन काही थोर व्यक्तींंना सुध्दा हा पुरस्कार दिला गेला आहे.

« PREV
NEXT »

Facebook Comments APPID